स्त्रियांना समजू नका बेकार, कारण त्याच आहे जीवनाचा आधार..

Sankalp Mahila Rojgar Upakram (SMRU)

संकल्प महिला रोजगार उपक्रम..

महाराष्ट्र संकल्प महिला रोजगार उपक्रम द्वारे प्रत्येक तालुक्यातील 100 महिलांना गृह उद्योगाद्वारे नवीन व्यवसाय सुरु करून दिला जात आहे.
प्रति माह 100 महिलांना मशीन, प्रशिक्षण आणि इतर साहित्य मोफत पुरविले जाते.
या अंतर्गत एकूण १० प्रकारचे गृह उद्योग सुरु करून दिले जाते जसे कि पापड निर्मिती उद्योग, अगरबत्ती आणि धूप बत्ती निर्मिती, लोणचे आणि मसाले उत्पादन, साबण उत्पादन, कपडे शिवणकाम, कापडी पिशवी निर्मिती, बेकारी पदार्थ निर्मिती, ब्युटी पार्लर व्यवसाय..
प्रशिक्षणा नंतर सर्टिफिकेट दिले जाते आणि भविष्यात व्यवसाय वाढी साठी बँकेद्वारे कर्ज मिळवून दिले जाते. धन्यवाद.

What we do ?

skill-training-women-647_072616041312

Training Services

66f2575a8b51c81e5a8308aa_mahila

Marketing plan

Business Consulting

महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना - 2024

केंद्र व राज्यशासनाकडून देशातील गोरगरीब नागरिकांसाठी विविध योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. यापैकी काही योजना फक्त महिलांसाठी राबविल्या जात असून त्यामध्ये महिला कर्ज, बचतगट, गृहउद्योग, स्वयंरोजगार इत्यादी योजनांचा समावेश आहे. आज आपण सदर लेखाच्या माध्यमातून महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनाबद्दलची माहिती सविस्तर पाहणार आहोत. महिलांच्या सबलीकरणासाठी, व्यवसायात पुढाकार घेण्यासाठी व आर्थिक दर्जा वाढवण्यासाठी महिलांना या विविध योजनांचा नक्कीच फायदा होणार आहे.

राज्य किंवा केंद्रशासनाकडून महिलांसाठी विविध योजना राबविण्याचा मुख्य हेतू म्हणजे त्यांना त्यांच्या पायावरती उभा राहता यावं, जेणेकरून कुटुंबाची जबाबदारी व इतर मूलभूत गरजा त्यांना स्वतः भागवता येतील. या विविध बाबींचा विचार करून महिलांच्या कामाशी निगडित जसे भरतकाम, शिवणकाम, विणकाम, पिठाची गिरणी अशा विविध योजनांचा समावेश शासनाकडून करण्यात आला आहे.

 

महिलांना व्यवसायासाठी प्रवृत्त करून त्यांना स्वावलंबी बनवणे, सक्षमीकरणाला चालना देणे हा शासनाचा विविध योजना राबविण्या मागचा मुख्य हेतू आहे. पारंपारिक विचार केला, तर मुलींना समाजात कमी मान दिला जातो. लहानपणापासून त्यांच्यावर दबाव टाकलं जातं, घराबाहेर पाठवले जात नाही. त्यांना सुद्धा पुरुषांइतकाच सन्मान मिळावा; म्हणून महिलांसाठी महाराष्ट्र शासनाकडून विविध योजना सुरु करण्यात आलेल्या आहेत.

1) लेक लाडकी योजना

महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी, मुलींचा मृत्यूदर कमी करण्यासाठी व त्यांना सशक्त, प्रबळ व आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2023 सादर करताना लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील म्हणजेच पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना जन्मापासून ते वयाच्या 18 वर्षापर्यंत 1 लाख 1 हजार रु. देण्यात येतात.

2) महिला उद्योगिनी योजना

महिलांना समाजात मानाच स्थान मिळावं, त्याचप्रमाणे विविध व्यवसायांमध्येसुध्दा महिला सक्षम व्हाव्यात, यासाठी शासनाकडून फक्त महिलांसाठी योजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्यापैकीच एक योजना म्हणजे महिला उद्योगिनी योजना होय. महाराष्ट्रातील ही एक महिला कर्ज योजना असून सदर योजनेच्या माध्यमातून लघुव्यवसायिक क्षेत्रातील व्यवसायिक, किरकोळ विक्रेते, उत्पादक किंवा स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या महिलांना व्यवसाय करण्यासाठी जास्तीत जास्त तीन लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येतं.

3) महिलांसाठी स्वर्णिमा योजना

स्वर्णिमा योजना महिला स्वयंरोजगार योजना अंतर्गत येणारी महत्त्वकांक्षी योजना असून सदरची योजना सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयामार्फत मागासवर्गीय उद्योजक महिलांसाठी राबविण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून महिलांना उद्योगासाठी 2 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येतं. महिलांना व्यवसायासाठी नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NBCFDC) यांच्याद्वारे खूपच कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून दिलं जातं.

4) महिला उद्योजक धोरण योजना

पुरुषाप्रमाणेच महिलांनासुध्दा सर्व क्षेत्रांमध्ये अग्रगण्य स्थान मिळावे, यासाठी शासनाकडून महिलांसाठी कर्ज योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. महिलांसाठीच्या कर्ज योजनेपैकीच मोठ्या प्रमाणावर कर्ज उपलब्ध करून देणारी योजना म्हणजे महिला उद्योजक धोरण योजना. सदरची महिला कर्ज योजना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या विशेष धोरणाअंतर्गत राबविण्यात येत असून या योजनेच्या माध्यमातून महिलांना विविध उद्योगासाठी 20 लाखापासून 1 कोटीपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येत.

5) महिला सन्मान योजना

नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये लेक लाडकी योजनेसह महिलांसाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली. त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे महिला सन्मान योजना होय. ST प्रवासामध्ये विशेष महिलांसाठी सवलत देणारी कोणतीही योजना उपलब्ध नसण्याची बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर, महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देण्याची महिला सन्मान योजना सुरू करण्यात आली.

6) महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना

एखाद्या महिलेचा पती अकस्मात किंवा अन्यकारणामुळे मृत्यू पावल्यास, अशा महिलांना समाजात वावरताना खूप अडचणीना सामोर जाव लागत. हीच बाब लक्षात घेऊन विधवा महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी व स्वबळावर आपला आयुष्य जगण्यासाठी राज्यशासनाच्या महिला कल्याण विभागाकडून विशेष विधवा महिलांसाठी विधवा पेन्शन योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी विधवा महिलांना दरमहा 1,000 रु. पेन्शन राज्य शासनाकडून देण्यात येतं.

7) प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0

शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत गरोदर महिला आणि स्तनदा मातांना 5,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) मुख्यत्व केंद्रशासनाची योजना असून ही योजना महिला आणि बाल विकास मंत्रालयामार्फत चालविण्यात येते. लाभार्थी गरोदर महिलांना योजनेची रक्कम तीन टप्प्यांमध्ये दिली जाते. उर्वरित 1,000 रु. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत महिलांना प्रसूतीनंतर दिले जातात. म्हणजेच एकंदरीत महिलांना सरासरी 6,000 रुपये सदर योजनेच्या माध्यमातून मिळतात.

8) माझी कन्या भाग्यश्री योजना

मुलींचा जन्मदर प्रमाण सुधारण्यासाठी, स्त्री शिक्षणाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून 1 एप्रिल 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत, जर पालकांनी नसबंदी केली किंवा दुसरी मुलगी जन्मल्यापासून 6 महिन्याच्या आत पालकांनी नस बंदी केल्यास त्यांना 50,000 रुपयांची रक्कम शासनाकडून मुलीच्या नावावर बँक खात्यात जमा करण्यात येते.

9) सुकन्या समृध्दी योजना

पालकांना आपल्या मुलीसाठी असलेली चिंता दूर करण्यासाठी शासनाकडून 22 जानेवारी 2015 पासून सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात करण्यात आली. सुकन्या समृद्धी योजना केंद्र सरकारची अल्पबचत योजना असून योजनेअंतर्गत मुलीच्या पालकांना 250 रुपयापासून 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. अल्पबचत ठेवीवर लाभार्थ्यांना मुलीच्या भविष्यासाठी फायदा व्हावा म्हणून 7.6% व्याजदर दिला जातो. हा व्याजदर वर्षाच्या आर्थिक महिन्यानंतर बदलत असतो.

10) जननी सुरक्षा योजना

देशातील गरीब कुटुंबातील गर्भवती महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यामार्फत जननी सुरक्षा योजना सुरू करण्यात आली. जननी सुरक्षा योजनेच्या माध्यमातून गरोदर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील महिलांना शासनाकडून रु. 1400 इतकी आर्थिक मदत करण्यात येते. याशिवाय गर्भवती महिलांना मदत करणाऱ्या आशा सहयोगीना प्रसूती प्रोत्साहनासाठी रु. 300 आणि प्रसूतीनंतर सेवा प्रदान करण्यासाठी रु. 300 इतकी रक्कम देण्यात येते.

11) महिला समृद्धी कर्ज योजना

महिला समृद्धी कर्ज योजना ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फक्त विशेषतः महिलांसाठी राबविण्यात येणारी व्यावसायिक कर्ज योजना आहे. व्यवसायिक महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी व त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी महिला समृद्धी कर्ज योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी 5 लाख ते 20 लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येतं. कर्जाचा व्याजदर 4 टक्के असेल, तर परतफेडीचा कालावधी 3 वर्षाचा असेल.

12) मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. १,५००/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात येणार आहे.

Work with us...

shortly Launching Ayurvedic Products.  For details call us –  

Scroll to Top