About us..

संकल्प महिला रोजगार उपक्रम मागील ५ वर्षांपासून ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आणि आर्थिक प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे.

संकल्प महिला रोजगार उपक्रम द्वारे प्रत्येक तालुक्यातील ३० महिलांना गृह उद्योगाद्वारे नवीन व्यवसाय सुरु करून दिला जात आहे.
प्रति माह ३० महिलांना मशीन, प्रशिक्षण आणि इतर साहित्य मोफत पुरविले जाते.
या अंतर्गत एकूण १० प्रकारचे गृह उद्योग सुरु करून दिले जाते जसे कि पापड निर्मिती उद्योग, अगरबत्ती आणि धूप बत्ती निर्मिती, लोणचे आणि मसाले उत्पादन, साबण उत्पादन, कपडे शिवणकाम, कापडी पिशवी निर्मिती, बेकारी पदार्थ निर्मिती, ब्युटी पार्लर व्यवसाय.
प्रशिक्षणा नंतर सर्टिफिकेट दिले जाते आणि भविष्यात व्यवसाय वाढी साठी बँकेद्वारे कर्ज मिळवून दिले जाते. धन्यवाद.

what we do ?

skill-training-women-647_072616041312

Training Services

66f2575a8b51c81e5a8308aa_mahila

Marketing plan

110189.rural-women

Business Consulting

Training Given
Training for business
+
Reached villages
Working for Years

संकल्प महिला रोजगार उपक्रम सोबत खालील उद्योग सुरु करू शकता..

1. पापड निर्मिती उद्योग

जवळपास सर्वच वयोगटातील लोकांना हा पदार्थ खायला आवडतो. त्यामुळे बाजारात त्याची मागणीही जास्त आहे.

खरंतर आजच्या व्यस्त काळात लोकांकडे स्वतःसाठी घरी पापड बनवायला पुरेसा वेळ नसतो, म्हणून ते रेडिमेड पापड खरेदी करतात. अशा परिस्थितीत ग्राहकांच्या मागणीमुळे दुकानदार मोठ्या प्रमाणात पापड खरेदी करतात. याशिवाय काही लोक घरबसल्या हा व्यवसाय करून विविध प्रकारचे पापड बनवून थेट ग्राहकांना विकतात.

या व्यवसायाची बाजारात जास्त मागणी आहे, जर तुम्ही देखील हा व्यवसाय केला तर तुम्ही यापेक्षा खूप जास्त कमवू शकता.

2. लोणचे निर्मिती उद्योग

आपल्या सर्वांना माहीत आहे की जेव्हाही आपण मसालेदार पदार्थांचे नाव घेतो तेव्हा लोणच्याचे नाव सर्वात वर येते. लोक आपल्या गावात लोणचे अगदी सहज बनवतात त्यामुळे लोणची बनवण्याची प्रक्रिया फारशी अवघड नसते हे यावरून स्पष्ट होते. म्हणूनच हा व्यवसाय कोणीही सुरू करू शकतो. फक्त त्याची माहिती असणे गरजेची आहे.

 

कोणतीही नवीन व्यक्ती अगदी कमी खर्चात आपल्या घरातून लोणच्याचा व्यवसाय सुरू करू शकते. जर त्या व्यक्तीने घरातून लोणचे बनवण्याचा व्यवसाय सुरू केला तर तो अगदी सहज आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने लोणच्याचा व्यवसाय सुरू करू शकतो. 

3.अगरबत्ती आणि धूप निर्मिती उद्योग

  • भारतामध्ये प्रत्येक धर्मामध्ये घरा घरांत अगरबत्ती वापरली जाते.
  • त्यासोबतच अगरबत्ती ही कीटकनाशक म्हणून सुधा का करते.
  • अगरबत्तीची मागणी 12 महिने सुरूच असते.
  • आणि सणांच्या काळात अगरबत्तीचा मागणी दुप्पट होते.

4. मसाले निर्मिती उद्योग

आपल्या भारतात आणि जगात कोणताही कार्यक्रम असल्यास जेवण बनवण्यासाठी मसाल्यांची गरज पडत असते. तसेच सण, पार्टी, लग्न, कार्यक्रम, वर्धापनदिन इत्यादी कोणत्याही समारंभात पाहुण्यांसाठी खास जेवणाची व्यवस्था केली जाते. यामुळे हे सर्व लोक बाजारातून विविध प्रकारचे मसाले मिळवतात किंवा घाऊक विक्रेत्याशी संपर्क साधून पदार्थ आणखी रुचकर बनवतात.

मसाला शब्द एकताच आपल्या तोंडाला पानी सुटू लागते, आणि आपल्या मनामध्ये विविध प्रकारच्या मसाल्याची आठवण येत असती, मग त्यामध्ये कोथिंबीर, हळद, मिरची, वेलची किवा इतर मसाले असोत. ह्या विविध प्रकारचे मसाले वापरल्याने आपल्या भाज्यांना अप्रतिम चव येते.

5. साबण उत्पादन

साबण (soap) ही एक अशी वस्तू आहे, जी सर्व शहरांमध्ये आणि खेड्यांमध्ये दैनंदिन जीवनात वापरली जाते. 21 व्या शतकाच्या या नव्या युगात, जवळपास सर्व वयोगटातील लोकांसाठी विविध प्रकारचे साबण बाजारात उपलब्ध आहेत. नवजात बाळ असो, बालपण असो, तारुण्य असो वा म्हातारपण, प्रत्येकासाठी कुठला ना कुठला साबण बाजारात उपलब्ध असतो, जर आपण साबणाच्या प्रकारांबद्दल बोललो,  प्रत्येक प्रकारच्या साबणाचा स्वतःचा वेगळा उपयोग आहे. जसे-

  • – भांडी धुण्याचा साबण
  • – कपडे धुण्याचा साबण
  • – आंघोळीचा साबण
  • – चेहरा धुण्यासाठी वापरला जाणारा साबण
  • – इतर सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरलेले साबण

या वेगवेगळ्या वयोगटातील सर्व साबण आणि वेगवेगळ्या कारणांसाठी वापरल्या जाणार्‍या विविध प्रकारच्या साबणांच्या किंमतीही भिन्न आहेत. या विविध प्रकारच्या साबणांना बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे आणि मोठी मागणी असतानाच बाजारात साबणाचा व्यवसाय किती मोठा आहे हे स्पष्ट होते.

6. कपडे शिवणकाम आणि कापडी पिशवी निर्मिती

शर्वरी यांनी सुरवातीस दोन शिवणयंत्रावर विविध प्रकारच्या कस्टमाईज्ड बॅग्ज् बनवायला सुरवात केली, आता स्टाफची संख्या पस्तीस जणांपर्यत येऊन पोहचली आहे आणि शिलाई मशीनची संख्या आहे पंचवीस.
हा सगळा प्रवास साध्य झाला आहे, शर्वरी यांच्या सतत नवीन शिकत रहायचे या अभ्यासू वृत्तीमुळे. मध्यमवर्गीय घरात अनेक अडचणींना सामना देत शर्वरी यांचा संसार सुरु होता.
आपल्या घराची आर्थिक स्थिती बदलायची असेल तर केवळ नोकरी न करता व्यवसाय करावा अशी त्यांची इच्छा होती. असा विचार मनात चालू असतानाच प्लॅस्टिक बॅग्जवरच्या वापरावर बंदी आली. हीच व्यवसायाची संधी समजून शर्वरी यांनी थेट या व्यवसायात उडी मारली. 

7. बेकरी प्रोडक्ट निर्मिती

भारतात पुरेशी स्वयंचलित आणि अर्ध-स्वयंचलित ब्रेड तसेच बिस्किट उत्पादक युनिट असली तरी लोकल बेकरीमधून ताजी ब्रेड आणि इतर उत्पादनांना प्राधान्य देणारे असंख्य लोक अजूनही आहेत. बेकरी उत्पादने ही कमी किंमतीच्या दृष्टीने आणि जलद वाढीमुळे आणि लोकांच्या खाण्याच्या सवयीनुसार मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्‍या वस्तू आहेत. प्रक्रिया केलेले अन्न क्षेत्रात बेकरी उद्योगाने महसूल मिळवताना तिसरे स्थान मिळविले आहे.

महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात आणि पश्चिम बंगालसारख्या औद्योगिक राज्यात दरडोई खप जास्त आहे. बिस्किटे ग्रामीण भागातही लोकप्रिय आहेत.

सर्वसाधारणपणे ग्रामीण भागात बिस्किटांपैकी सुमारे 55% बिस्किटे विकल्या जातात. अशा प्रकारे, बेकरी व्यवसाय उघडणे नवीन स्टार्टअप उद्योजकांसाठी एक आशादायक आणि फायदेशीर व्यवसाय मानले जाते.

8. द्रोण आणि पत्रावळी निर्मिती उद्योग

आपल्या महाराष्ट्रा मध्ये पूर्वी पासून लग्न सोहळ्यामध्ये आणि मंदिरातील प्रसाद-महाप्रसादासाठी जेवणामध्ये द्रोण पत्रावळीचा वापर केला जातो. पण वृक्षतोडीचा समस्येमुळे पानांचा पासून तयार केलेले द्रोण आणि पत्रावळी आज काल जास्त वापरात नाही त्याला पर्याय म्हणून प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा द्रोण पत्रावळी वापरात येऊ लागल्या पण शासनाने प्लॅस्टिक आणि थर्माकोल वापरावर बंदी आणली. त्यामुळेच कागदापासून बनवलेले द्रोण आणि पत्रावळी यांचा वापर आता वाढला आहे.

हे वजनाने हलके असल्याकारणाने सहल किंवा प्रवासामध्ये हे वापरण्यास अगदी सोयीस्कर वाटते. आजकाल आपण जर नीट लक्ष देऊन निरीक्षण केले असेल तर तुमच्या पण लक्षात आले असेल की नाश्ता सेंटर सारख्या बर्‍याच ठिकाणी वडा पाव, समोसे, दाबेली असले पदार्थ दुकानदार कागदाचा प्लेट मधेच देतात. याचे खूपसारे फायदे आहेत जस की दुकानदारांना प्लेट धुण्याची गरज नाही भासत त्यामुळे स्वच्छता राहते आणि या प्लेटांची अगदी सहज विल्हेवाट लावता येत असल्याने प्रदूषण नाही होत.

9. ब्युटी पार्लर सेवा

ब्युटी पार्लर व्यवसाय ग्राहकांना केसांची शैली, मेकअप ऍप्लिकेशन, त्वचा निगा उपचार आणि नखांची निगा राखणे यासह अनेक प्रकारच्या सौंदर्य आणि ग्रूमिंग सर्विस देण्याचे काम करतात. ब्युटी पार्लर व्यवसायात यशस्वी होण्यासाठी, उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करणे, स्वच्छ आणि आरामदायक वातावरण राखणे आणि लेटेस्ट ब्युटी ट्रेंड आणि तंत्रज्ञानासह तयार राहणे आवश्यक आहे. या उद्योगातील दीर्घकालीन यशासाठी उत्कृष्ट सेवा आणि ग्राहकांचे समाधान याद्वारे एक निष्ठावान ग्राहक तयार करणे महत्त्वाचे आहे.

स्पा सेंटर ,रिफ्लेक्सोलॉजी सेंटर ,केश कर्तनालय ,वेलनेस सेंटर ,हेअर अँड स्किन क्लिनिक कॉस्मेटोलॉजी सेंटर इत्यादी अश्याच अजून ब्युटी पार्लर व्यवसायामध्ये कॅटेगरी असतात.तुम्हाला स्पेशल एकाच कॅटेगरीमध्ये ब्युटी पार्लर व्यवसाय करायचा असेल तर करू शकता किंवा सगळ्या कॅटेगरी घेऊन सुद्धा करू शकता.

Start Your Business

Scroll to Top